CSR Registration
Govt. of India , Ministry of Corporate Affairs , Office of the registrar of Companies has been Registered for under taking CSR Activities and the Registration is CSR00058190
80 G Exempted to Donor
80 G Exempted to Donar
Govt. of India Income Tax Department Revalid
80G Certificate Under
Unique ID Registration No. AAATO2284JE20219
Assessment Year: 2022- 2023 to 2026-2027
Bharatratna Maharshi Karve Skill Development and Vocational Training Institute Dapoli

दापोली तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) दापोली,जि.रत्नागिरी व्यतिरीक्त व्यवसाय शिक्षण देणा-या स्वयंसेवी / खाजगी संस्था नसल्यामुळे,दापोली तालुक्यातील युवक-युवती व महिला,महाविद्यालयीन युवक-युवती यांची व्यवसाय शिक्षणाची होणारी गैरसोय दुर करण्यासाठी त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी व दापोली तालुक्यात रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता सन २००९ पासुन दापोली,जि.रत्नागिरी येथे भारतरत्न महर्षी कर्वे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या नावाने सुरु करण्यांत आले.
प्रशिक्षण केंद्राचे कार्य हे ओम शिवशक्ती शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या हेतुने ना नफा ना तोटा या तत्वावर चालते.
भारतरत्न महर्षी कर्वे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातुन दापोली तालुक्यातील युवक-युवती व महिला तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर रोजगारक्षम बनविणे व त्यांना रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे,स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे ही काळाची गरज ओळखुन ती पुर्ण करण्यांच्या हेतुने शिवाय रोजगाराबाबत आजच्या बदलत्या कौशल्य विकास प्रशिक्षणाला अधिक प्रोत्साहन देण्याच्या हेतुने विविध क्षेत्रांमध्ये व स्थानिक व भौगोलिक परिस्थीतीचा विचार करून,शासनमान्यताप्राप्त कमी कालावधीचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. संस्थेला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा मागील १५ वर्षापासुन अनुभव आहे.
प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काही कौशल्य अभ्यासक्रमासाठी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी क्षमता वृध्दींगत (कॅपेसीटी बिल्डींग ) विभाग खास निर्माण करण्यांत आलेला आहे.
सीएसआर माध्यमातुन कंपनीकडुन कौशल्याचे प्रशिक्षणाकरिता निधी उपलब्ध करुन दिल्यास,प्रशिक्षण संस्थेमध्ये तसेच दापोली तालुक्याच्या गावांमध्ये ग्रुप ट्रेनिंगव्दारे (समुह प्रशिक्षण ) युवक-युवती,महिलांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यांत येते जेणेकरुन युवा पिढीला रोजगार उपलब्ध होतील.
भारतरत्न महर्षी कर्वे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र,दापोली यांचे माध्यमातुन दापोली तालुक्यातील युवक-युवती व महिला यांना संस्थेने कौशल्य प्रशिक्षण प्रदान करुन,त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगार-स्वयंरोजगाराच्या अनेक संधी मिळुन,आत्मनिर्भर व स्वावलंबी होत आहेत.